
दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी कुनो नॅशनल पार्कात सोडलेल्या प्रभाश आणि पावक या दोन चित्त्यांना नवीन घर मिळाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते आज त्यांना गांधी सागर अभयारण्यात सोडण्यात आले.
सहा वर्षांचे हे दोन्ही मोदी चित्ते दक्षिण आफ्रिकेतील वॉटरबर्ग रिझर्व्ह येथून फेब्रुवारी 2023 मध्ये कुनो नॅशनल पार्क येथे आणले होते. या दोन्ही चित्त्यांना रस्तेमार्गे निमच आणि मंदसौर जिह्यापर्यंत पसरलेल्या गांधी सागर अभयारण्यात आणण्यात आले. दक्षिण आफ्रीकेतील बोत्सवाना येथून आणखी चार चित्ते आणण्यात येणार असून त्यांनाही गांधी सागर अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली.