
केईएम इस्पितळातील एका वरिष्ठ डॉक्टरांविरोधात सहा महिलांनी विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात डॉ. रवींद्र देवकर यांच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
केईएम इस्पितळाच्या फॉरेन्सिक विभागातील प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांनी आमचा विभयभंग केला, अशी तक्रार सहा महिलांनी केली आहे. त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी गंभीर दखल घेत डॉ. देवकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे इस्पितळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात डॉ. देवकर यांना न्यायालयाकडून सोमवारपर्यंत इंटरीम मिळाला आहे. भोईवाडा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.