खेळता खेळता तिन्ही भावंडांची कालव्यात उडी, एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश

पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील सहजपूर येथे तीन लहान भावंडे कालव्याशेजारी खेळत होती. खेळता खेळता तिघांनीही कालव्यात उडी मारली. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. यानंतर एका इसमाने धाव घेत दोघांना वाचवले तर एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सहजपूर येथील माकरवस्ती कालव्याशेजारी मुजावर कुटुंब राहते. मुजावर कुटुंबातील 7, 5 आणि 3 वर्षे वयोगटातील मुलं कालव्याशेजारी खेळत होती. खेळता खेळता तिन्ही भावंडांनी कालव्यात उडी घेतली. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. महिलेचा आवाज ऐकून निलेश खोमणे या इसमाने धाव घेत कालव्यातून दोघांना वाचवले. तर तीन वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेमुळे मुजावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खोमणे यांनी तात्काळ धाव घेतल्याने अन्य दोन चिमुकल्यांचा जीव वाचला.