
बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघाताची घटना समोर आली आहे. ग्राउंड हँडलिंग एजन्सीची मिनी बस पार्क केलेल्या इंडिगो विमानाला धडकली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती विमानतळ प्रवक्त्यांनी दिली.
एका तृतीय पक्ष ग्राउंड हँडलिंग एजन्सीद्वारे चालवली जाणारी मिनी बस शुक्रवारी दुपारच्या सुमारास पार्क केलेल्या इंडिगो कंपनीच्या नॉन-ऑपरेशनल विमानाच्या अंडरकॅरेजला धडकली.
इंडिगो एअरलाइन्सने बंगळुरू विमानतळावरील घटनेबाबत प्रेस निवेदन प्रसिद्ध केले आहे. बंगळुरू विमानतळावरील घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती आवश्यकत ती कारवाई केली जाईल, असे इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे.