
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच वर्षीच्या अखेरीस होणार्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच काँग्रेसने जोर लावायला सुरुवात केली आहे. रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बिहारच्या बक्सर येथे जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला. मोदी आणि नितीश कुमार यांची युती संधीसाधू असल्याचा हल्लाबोल खरगे यांनी केला.
नरेंद्र मोदी और नीतीश कुमार की जोड़ी सिर्फ कुर्सी के लिए है।
ये दोनों लोग बिहार और देश की भलाई के लिए नहीं, बल्कि दलितों, आदिवासियों, पिछड़ों और किसानों को बर्बाद करने के लिए एक साथ आए हैं।
: कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge
📍 बक्सर, बिहार pic.twitter.com/EZ2R0YQ13S
— Congress (@INCIndia) April 20, 2025
‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ असा नारा देत काँग्रेसने जाहीर सभा घेतली. या सभेला मल्लिकार्जुन खरगे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीमध्ये बिहारची जनता एनडीएला मतदान करणार नाही असा विश्वास व्यक्त केला. खरगे यांनी आपल्या भाषणादरम्यान मोदींच्या खोटेपणाची यादीच वाचून दाखवली.
मोदींचा खोटेपणाची यादी
– 100 दिवसात विदेशातून काळा पैसा परत आणणार
– सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार
– दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार
– पेट्रोल-डिझेल, नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी करणार
– 2022 पर्यंत गंगेची सापसफाई करणार
– शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
– 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरं मिळणार
– हवाई चप्पल घालणाऱ्यांना विमानात फिरवणार
– शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी
– देशातील महागाई संपवणार
– मेक इन इंडिया अंतर्गत नवीन कारखाने खोलणार
नरेंद्र मोदी के झूठ की लिस्ट:
• 100 दिन में विदेशों से काला धन वापस लाऊंगा
• सबके खाते में 15-15 लाख रुपए डालूंगा
• हर साल 2 करोड़ नौकरी दूंगा
• पेट्रोल-डीजल, गैस सिलेंडर सस्ता करूंगा
• साल 2022 तक मां गंगा को साफ कर दूंगा
• किसानों की आमदनी दोगुनी हो जाएगी
• साल 2022 तक… pic.twitter.com/9WjtZbkrNK— Congress (@INCIndia) April 20, 2025