वांद्र्यात भिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग, मांड्यांना स्पर्श करून केली दमदाटी

वांद्र्यात भिकाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला आहे. या भिकाऱ्याने या महिलेच्या मांड्यांना हात लावला आणि असे कपडे घालू नकोस असा दम दिला आहे. पीडित महिलेने या भिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.

शनिवारी सांयकाळी एक महिला वांद्र्यातील एका रस्त्यावर उभी होती. ही महिला रिक्षाची वाट बघत होती. रिक्षात बसल्यावर एक उघडा भिकारी तिथे आला आणि त्याने या महिलेच्या मांड्या धरल्या आणि खायला मागितले. या महिलेने काही द्यायला नकार दिला. तेव्हा हा भिकारी चिडला. या महिलेवर ओरडला आणि म्हणाला की कुणीही स्पर्श करू नये म्हणून पूर्ण कपडे घालत जा. तसेच पुढे जाऊन तो थुंकलाही. दरम्यान महिलेने या भिकाऱ्याचा व्हिडीओ शूट करून सोशल मिडियावर व्हायरल केला. एक्सवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.