Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे.
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – मेहनतीने कामे मार्गी लावा, फायदा होईल
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सर्वांच्या सहकार्याने आनंदी वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहारात सतर्कता ठेवा
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी
कौटुंबिक वातावरण – वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.
आरोग्य – उत्साहात नव्या जोमाने कामाला लागा
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात संयमाने वागण्याची गरज आहे.
आरोग्य – नैराश्यावर मात करण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक निर्णय पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवल्यास दिवस शांततेत जाईल.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे
आरोग्य – उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता
आर्थिक – प्रवासात वस्तूंची काळजी घ्यावी
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – घरातील कामांचा व्याप वाढणार आहे.
आरोग्य – कुटुंबियांच्या प्रकृीकडे लक्ष द्यावे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उन्हापासून काळजी घेण्याची गरज
आर्थिक – आर्थिक लाभासाठी महत्त्वाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – जुन्या मित्रांच्या भेटीगाठीची शक्यता

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात येणार आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अनपेक्षित खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कोणलाही दुखावू नका

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांची मते जाणून घ्या