
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पंजाब किंग्जने 5 गडी राखून हरविले. मात्र, बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएलमध्ये कमी डावात एक हजार धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. या सामन्यात रजत पाटीदारने 18 चेंडूंत 23 धावा करीत आयपीएलमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने 30 डावांत हा पराक्रम करीत सचिन तेंडुलकर व ऋतुराज गायकवाड यांना मागे टाकले. या दोघांनी 31 डावांत एक हजार आयपीएल धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा विक्रम हिंदुस्थानी फलंदाज साई सुदर्शनच्या नावावर आहे. त्याने केवळ 25 डावांमध्ये हा विक्रम केलाय. पाटीदारने आतापर्यंत 34 आयपीएल सामन्यांमध्ये एक शतक व ९ अर्धशतकांसह एकूण १००८ धावा केल्या आहेत.
आयपीएलमधील वेगवान हजारी हिंदुस्थानी फलंदाज
साई सुदर्शन – 25 डाव (2024)
रजत पाटीदार – 30 डाव (2025)
सचिन तेंडुलकर – 31 डाव (2010)
ऋतुराज गायकवाड – 31 डाव (2022)
तिलक वर्मा – 33 डाव (2019)
पंजाब वि. बंगळुरु दु. 3.30 वा. (मुल्लानपूर)
मुंबई वि. चैन्नई सायं. 7.30 वा. (वानखेडे)