
जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिह्यात भूस्खलनाच्या धोक्यामुळे खबरदारी म्हणून 22 पुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध मचैल माता मंदिराला जोडणाऱया किश्तवाड-पद्दर रस्त्यावर आज शनिवारी तिसऱया दिवशीही वाहतूक ठप्प होती. या भागात सतत भूस्खलनाचा धोका असतो. स्थानिकांच्या सुरक्षेसाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. डोंगराळ गावातील पुटुंबांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या राहण्याची सोय प्रशासनाने केली आहे.