काश्मीरमधील वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन लांबणीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 एप्रिल रोजी होणाऱ्या जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. चार महिन्यात तिसऱ्यांदा उद्घाटन लांबणीवर पडले आहे. शनिवारी कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल सेवा आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक योजनेचे उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार होते. परंतु, खराब हवामान असल्याने हे उद्धाटन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. पीएमओशी चर्चा केल्यानंतर लवकरच उद्घाटनाची नवी तारीख जाहीर केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.