
दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पिकू’ हा चित्रपट येत्या 9 मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे. 8 मे 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पदुकोणने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. ‘पिकू’ हा चित्रपट नेहमीच हृदयाच्या जवळ राहिलेला आहे. इरफान खानला आपण मिस करत आहोत, असे दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात 140 कोटींची कमाई केली होती.