
लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना कार दरीत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. लगातार पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
कारमधील सर्व जण निजमुला येथून लग्न समारंभ आटोपून दशोली विकासखंड येथील घरी परतत होते. यादरम्यान चमोलीतील कोरेलधार येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.