
उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तसेच कल्याण या प्रमुख स्थानकांत 18 एप्रिलपासून 15 मेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात रहावी या दृष्टिकोनातून प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.