डॉ. मुमताज पटेल यांचा इंग्लंडमध्ये गौरव

हिंदुस्थानी वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची युनायटेड किंग्डमच्या प्रतिष्ठत रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. इंग्लंडच्या लंकाशायरमध्ये जन्मलेल्या डॉ. मुमताज पटेल या फिजिशियनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई आणि मुस्लीम महिला आहेत. त्या मँचेस्टरमध्ये किडनी विशेषज्ञ म्हणून कार्यरत असून संस्थेला आणखी नावारूपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची भावना डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.