
Apple ने हिंदुस्थानातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आयफोन पाठवले आहेत. ही संख्या इतकी मोठी होती की यासाठी 6 मालवाहू विमाने वापरली गेली. हिंदुस्थानातून अमेरिकेत 6 टन आयफोन पाठवण्यात आले. आणि त्यांची किंमत सुमारे आहे, असे एका वृत्तातून म्हटले आहे.
Apple ने हिंदुस्थानातून अमेरिकेत 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे आयफोन पाठवले आहेत. अमेरिकन डॉलरचे हिंदुस्थानच्या चलनात रूपांतर केले तर, ही रक्कम 17 हजार कोटी रुपये होते. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टॅरिफ नियम लागू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या खर्चाचे मार्जिन राखण्यासाठी हा निर्णय घेतला. हिंदुस्थानवर 26 टक्के कर लादण्यात आला आहे, हा कर चीनपेक्षा कमी आहे. मात्र, नव्या टेरिफला चीन वगळता इतर देशांना अमेरिकेने 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.
Apple ने हिंदुस्थानातून अमेरिकेत 600 टन आयफोन पाठवले आहेत. यासाठी कंपनीने 6 मालवाहू विमाने वापरली आहेत. प्रत्येक मालवाहू विमानात 1 टन आयफोन होते. मार्च महिन्यात फॉक्सकॉनने 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे हँडसेट पाठवले. आतापर्यंत एकाच महिन्यात केलेल्या निर्यातीच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे.
निर्यात केलेल्या हँडसेटमध्ये सर्वाधिक संख्या Apple iPhone 13, 14, 16 आणि 16e मॉडेलची आहेत. या वर्षी फॉक्सकॉनने हिंदुस्थानातून अमेरिकेत एकूण 5.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे हँडसेट निर्यात केले आहेत. या पार्श्वभूमीवर, येत्या काळात आयफोनच्या किमती वाढू शकतात, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला आहे.