जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो… भाजपला खांदा द्यायची वेळ आलीय; साहेबांचा आवाज ऐकताच सभागृह उसळले

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो.. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा साद घालणारा हा खणखणीत आवाज कानावर पडला. शिवसैनिकांनी खच्चून भरलेले सभागृह एकदम उसळले. आपले ‘साहेब’ बोलतायत, तोच आवाज, तो ठाकरी बाणा ऐकताच ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा गजर सभागृहात घुमला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक धगधगता विचार ही नाशिककरांशी संवाद साधणारी चित्रफित सादर करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांचे खणखणीत आणि सडतोड विचार ऐकताना शिवसैनिकांच्या अंगावर शहारे उमटले. नाशिक म्हटलं तर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं आहे आणि ते राहणारच. नरेंद्र मोदी म्हणतात, तसं हे नातं नाही. नासिक से मेरा पुराना नाता है. में यहाँ वीर सावरकर जी के साथ काम करता था. जातील तिथे गंडवायचं आहे. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग, देशात यांना पुणीच ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना आधाराचा खांदा दिला. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आलीय, असे बाळासाहेब म्हणाले. भाजप व त्या नकली शिवसेनेने असे काय दिवे लागले की त्यांना भरभरून मतं मिळाली? लोकशाहीत असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावंच लागेल. मिंधे गटाचा समाचार घेताना बाळासाहेब म्हणाले, इतिहासात तुमची नोंद फितूर, गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी हे पाप धुतले जाणार नाहीत.