
ग्रामीण भागाने धार्मिकता जपली असल्याचे मत उद्योजक बाजीराव दांगट यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 2 येथे नुकताच हनुमान, शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.
हनुमान व शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 11 एप्रिलला मांडवडहाळे, कलश व मुर्ती मिरवणूक, गणेश पुजन, पुण्य वाचन, मातृका मंडल पुजा, नांदी श्राद्ध पुजन, आचार्य पुजन, मंडप पुजन, योगिनी पुजन, वास्तु मंडल पुजन, मुर्ती स्थापन विधी आणि भजन असे कार्यक्रम संपन्न झाले. तर 12 एप्रिल रोजी भजन, सवतो भद्र मंडल पुजन, नवग्रह मंडल पुजन, रुद्र मंडल पुजन, अग्रिपुजन, बली पुजन, पुर्ण अहुती, देहु येथील गाथा मंदिरचे केशव महाराज हगवणे यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. सायंकाळी ह.भ.प. रमेश महाराज थोरात यांची किर्तनरूपी सेवा संपन्न झाली. महालक्ष्मी प्रासादिक भजनी मंडळ उंब्रज नं.1 व 2, नाणेरबाबा भजन मंडळ, माऊली वारकरी संघटना, उंब्रज नं.1 व 2 आणि ग्रामस्थांची किर्तनाला साथ दिली.
या सोहळ्याला रंजना दांगट, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, मंदा दांगट, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे, ह.भ.प. धोंडीभाऊ पानसरे, आधार पतसंस्थेचे अध्यक्ष भरत दांगट, जिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, शिवाजीराव निलख, तनुजा सदाकाळ, खंडुशेठ चौधरी, पैलास हांडे, गणेश हांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास दांगट, व्हाईस चेअरमन जालिंदर शेवाळे, संजय हांडे उपस्थित होते.