नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीचे आरोपपत्र दाखल; राहुल गांधी, सोनिया गांधी, पित्रोदा यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप

सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेरॉल्डमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन दुबे तसेच अन्य लोकांचीही नावे आहेत.  असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. 

आज देशभरात ईडीच्या कार्यालयांबाहेर काँग्रेसचे आंदोलन

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कथित मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या कारवाईविरोधात आज देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली. गांधी हे एक असे कुटुंब आहे ज्यांनी देशासाठी रक्त सांडले, ही गोष्ट कदाचित भाजपा विसरली आहे. तपास यंत्रणांचा वापर करून आम्हाला रोखता येणार नाही. उलट विनाशकारी केंद्र सरकारविरोधात आमचा संकल्प अधिक दृढ होईल, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.