ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा 2.2 अब्ज  डॉलर्सचा निधी रोखला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे वळवला असून जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचा तब्बल 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखला आहे. पॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱयांवर आणि विद्रोही विचारांना आळा घालण्यासंदर्भात ट्रम्प प्रशासनाने दिलेले आदेश विद्यापीठाने धुडकावून लावले होते. विद्यापीठाच्या प्रशासनावर सरकारचे नियंत्रण असावे आणि त्यामध्ये मोठे बदल करावेत, अशी मागणी प्रशासनाने केली होती. हार्वर्डने या मागण्यांना नकार देत त्यांना बेकायदेशीर आणि असंवैधानिक म्हटले.

ट्रम्प प्रशासनाचा आदेश मान्य न केल्यामुळे हार्वर्डचा सुमारे 18 हजार कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला. दरम्यान, विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवर आणि भरती प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण असावे, अशा मागण्या प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. हार्वर्ड विद्यापीठ सरकारसमोर झुकणार नाही, असे विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन गार्बर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.