KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय

पंजाबने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताला युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने आपल्या जाळ्यात चांगलंच अडकवलं. कोलकाताला जिंकण्यासाठी 120 चेंडूंमध्ये 112 धावा धावांची आवश्यकता होती. कोलकाता हा सामना सहज जिंकणार, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु कोलकाताच्या स्वप्नांवर चहल आणि यान्सनने पाणी फेरलं. चहलने 4 षटकांमध्ये 28 धावा देत 4 गडी तंबुत धाडले. त्याला मार्को यान्सनची चांगली सात मिळाली. त्यानेही 3 विकेट घेत पंजाबचा विजय निश्चित केला. रघुवंशीने इम्पॅक्ट (37 धावा) दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कोलकाताला 100 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. 15.1 षटकांतच कोलकाताचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला आणि पंजाबने 16 धावांनी सामना जिंकला.