Rain Update – दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा

राज्यभरात सूर्यदेवाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत. परंतु दक्षिण महाराष्ट्र, मरठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागने दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पण या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

पुढचे पाच दिवस उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.