
एसबीआयने आजपासून आपल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिकांनाही हा सुधारित दर लागू राहील. एसबीआयने आपली अमृत वृष्टी ही योजना नव्या स्वरूपात आणली आहे, मात्र यातील परतावाही कमी करण्यात आला आहे. याआधी कॅनरा, कोटक महिंद्रा बँकांनीही आपल्या एफडींवरील व्याजदरांत कपात केली होती.