
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या तिरंदाजांनी चार पदकांवर नेम साधत आपली मोहीम फत्ते केली आहे. पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत रौप्य आणि वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात धीरज बोम्मादेवराने कांस्यपदक पटकावले आहे. धीरजने धैर्य आणि संयमाने खेळी करत कांस्यपदकाच्या सामन्यात यश प्राप्त केले. त्याने 2-4 ने पिछाडीवर असताना पुनरागमन करत स्पेनच्या आंद्रेस टॅमिनो मेडियलवर 6-4 ने मात केली. धीरजला यापूर्वी उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आणि पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या जर्मनीच्या फ्लोरियन उन्रहूकडून 1-7 असा पराभव पत्करावा लागला होता. हिंदुस्थानने या स्पर्धेत चार पदके पटकावली आहे. कंपाउंड मिश्र संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तर, पंपाउंड पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले होते.