देश हिटलरशाहीकडे चाललाय

देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातोय. केंद्र आणि राज्यातील सरकार संविधानाला मानत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सोमवारी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे आंबेडकरांच्या पुतळय़ाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी खासदार शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

संविधान अभी फॅशन बन गया है, असे देशाचे गृहमंत्री म्हणतात. बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल तर लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आपण संविधान वाचवले पाहिजे, असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले.