
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वाटचालीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये अचूक आणि तंतोतंत वर्णन केले आहे. यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर नियंत्रण मिळवले आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पद निर्माण करून घुसखोरी, आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी, आता अजितदादांचा नंबर, प्रत्येक मंत्रालय नियंत्रणात ठेवण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर, मुख्यमंत्री फडणवीस यांची अजितदादांच्या अर्थखात्यातही घुसखोरी.