डॉ. सुश्रुत घैसास यांचा पाय खोलात

तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस बजावली आहे. नोटिसीला चार दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. घैसास यांनी सोमवारी त्यांचा खुलासा पाठवला आहे, अशी माहिती मेडिकल कौन्सिलचे प्रशासक विंकी रुघवानी यांनी दिली. तनिषा भिसे प्रकरणानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालकांना पत्र पाठवून या प्रकरणात सहभागी डॉक्टरांची माहिती मागवली होती.