गाडी बॉम्बने उडवून देऊ! सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

अभिनेता सलमान खान पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

गेल्या वर्षी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्याला विविध माध्यमातून अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. सलमान खानला ही धमकी मिळाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणात दोन संशयित तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, याआधी गँगस्टरशी संबंधित गाण्याला आपले नाव दिल्यावरून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी देण्यात आली होती. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात गुरुवारी फोन करून ही धमकी देण्यात आली होती. या गाण्याच्या गीताकाराला भयंकर सूडाचा सामना करावा लागेल, असे फोनवरून म्हटलं गेलं होतं. यानंतर आता पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.