संतापजनक… आईनेच रेकॉर्ड केले मुलीचे अश्लील व्हिडीओ; बॉयफ्रेंडसह नातेवाईकांनाही पाठवले

पोटच्या मुलीचे आईनेच लपून अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडीत घडला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आईने तिच्या प्रियकरासोबत पळ काढला होता. बिबवेवाडी पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे खडकवासला परिसरातून दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीने तिच्या आईविरोधात तीन महिन्यांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मुलीच्या आईनेच तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते स्वतःच्या बहिणीसह इतर नातेवाईकांसह बॉयफ्रेंडला पाठवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी महिला तिच्या प्रियकरासह पसार झाली. अखेर 10 दिवसांपूर्वी त्यांचे लोकेशन खडकवासला असल्याचे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला समजले. त्यानुसार पोलिसांनी परिसर पिंजून काढला. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

अफेयरची माहिती घर मालकाला दिली…

अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती झाली होती. याबाबत तिने घर मालकाला सांगितले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी आईने असे कृत्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.