फलंदाजीचा क्रम बदलला, पण बॅट रुसलेलीच; 27 कोटींच्या पंतची 8 ची सरासरी अन् 80 चा स्ट्राईक रेट, एक-एक रनसाठी संघर्ष

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखऊनचा संघ यंदा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला असून मेगा लिलावात लखनऊने त्याला तब्बल 27 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. संघाची कामगिरी समाधानकारक असली तरी पंतची बॅट यंदा त्याच्यावर रुसली आहे. दिल्ली सोडून लखनऊला आलेल्या पंतची कामगिरी लौकिकास साजेशी राहिलेली नाही.

शनिवारी गुजरात टायटन्स संघाविरूद्धही त्याची बॅट एक-एक धावेसाठी संघर्ष करताना दिसली. या लढतीत त्याने 18 चेंडूत अवघ्या 21 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार ठोकले. विशेष म्हणजे पंतने फलंदाजीचा क्रमांकही बदलून बघितला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.

लखनऊचा नियमित सलामीवीर मिचेल मार्श उपलब्ध नसल्याने ऋषभ पंत सलामीला आला. सलामीला येऊनही त्याची बॅट काही विशेष चालली नाही. अर्थात त्याने दुसरा सलामीवीर एडन मार्करम (58) याच्यासोबत मिळून संघाला 65 धावांची सलामी दिली आणि संघाला विजयाची पायाभरणी करून दिली. या लढतीत लनखऊने गुजारता 6 विकेट्सने पराभव केला. यंदाच्या हंगामातील लखनऊचा हा चौथा विजय ठरला आहे.

धोनीचं नाव घेत पुढे पुढे करणाऱ्या रायडूला सेहवागनं सुनावलं, चूक सुधारत लाईव्ह समालोचनात म्हणाला…

दरम्यान, यंदाच्या हंगामात ऋषभ पंतने लखनऊकडून सहा सामने खेळले आहेत. यात त्याला अवघ्या 8 च्या सरासरीने 40 धावा करता आल्या आहेत. त्यात त्याचा स्ट्राईक रेटही 80 एवढा राहिला आहे. त्याच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा असताना तो लवकर बाद होत असल्याने संघ मालकासह चाहत्यांचीही निराशा होत आहे.

IPL 2025 – लखनौची गुजरात टायटन्सला धडक, रसातळाच्या संघाने अव्वल संघाला खाली खेचले