
बुधवारी रात्री चेंबूर येथे बिल्डरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकाने या गुह्याचा मुख्य आरोपी फिरोज खान आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा अफसर खान याला परिमंडळ-6 च्या पथकाने धारावी येथे पकडले. बेलापूरच्या पारसिक हिल येथे राहणारा सद्रुद्दीन खान हा शीव-पनवेल महामार्गाने त्याच्या गाडीने जात असताना चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला हेरले आणि संधी साधत खान याच्यावर गोळीबार केला होता.