Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून जैशच्या कमांडरसह तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश ए मोहम्मदचा कमांडर सैफुल्लाहसह त्याच्या दोन साथीदारांना लष्कराने कंठस्नान घातले.

दीड महिन्यापासून किश्तवाड आणि आसपासच्या परिसरात चार दहशतवादी लपून बसले होते. या दहशतवाद्यांवर बक्षीस ठेवले होते. शुक्रवारी लष्कर आणि या दहशताद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात अखेर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले.