Gujarat Fire – अहमदाबादमध्ये निवासी इमारतीत अग्नीतांडव, जीव वाचवण्यासाठी महिला आणि मुलांच्या बाल्कनीतून उड्या

अहमदाबादमधील एका निवासी इमारतीत भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी महिला आणि मुलांनी बाल्कनीतून उड्या घेतल्या. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कळते.1

अहमदाबादमधील खोखरा सर्कल येथील पारिसकर 1 अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. यानंतर इमारतीतील लोकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी महिला आणि मुलांनी इमारतीच्या बाल्कनीतून उड्या घेतल्या.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. दुर्घटनेत 20 जणांना वाचवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग आणि महिला, मुलांची जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे.