महिलेने स्वतःच्या छातीत इम्प्लांट केली बंदुकीची गोळी, सामूहिक बलात्काराचा रचला बनाव

एका महिलेवर गोळी झाडून सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा पोलिसही चक्रावून गेली. त्या महिलेवर अशा कुठल्याच प्रकारचा अत्याचार झाला नव्हता. इतकेच नाही तर गोळी झाडल्याची गोष्ट खरी वाटावी म्हणून या महिलेने बंदुकीची गोळी स्वतःच्या छातीत रोपण केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार 29 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या बरेली पोलिसांना एक तक्रार मिळाली. एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिच्या गोळी झाडल्याचे पीडीत महिलेच्या भाचीने सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. पण महिलेवर कुठलाच अत्याचार झाले नसल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पण्ण झाले. ज्या ठिकाणी अत्याचार झाला, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. जिथून आपले अपहरण झाल्याचा दावा या महिलेने केला त्या ठिकाणी ही महिला एका रिक्षातून प्रवास करत होती. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतली आणि कसून चौकशी केली. तेव्हा महिलने हा सगळा बनाव रचल्याची कबुली दिली.

या महिलेने एका लोकप्रतिनिधीला ब्लॅकेमेल केल्याप्रकरणी कोर्टात केस सुरू होती. त्याचा लवकरच निकाल लागणार होता. हा निकाल आपल्या विरोधात लागेल अशी या महिलेले भिती होती. यातून वाचण्यासाठीच आपण हा बनाव रचल्याचे या महिलेने सांगितले.