
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हाप्रमुख – राजेंद्र खुपसरे (वर्धा, हिंगणघाट), सहसंपर्कप्रमुख – सीताराम भुते (वर्धा जिल्हा), वर्धा जिल्हाप्रमुख – आशीष पांडे (आर्वी व देवळी पुलगाव), वर्धा जिल्हा समन्वयक – चंद्रकांत घुसे, उपजिल्हाप्रमुख – सतीश धोबे (हिंगणघाट), निहाल पांडे (वर्धा), संघटक – लक्ष्मण डंभारे (हिंगणघाट), तालुकाप्रमुख – रवींद्र तायडे (हिंगणघाट), शहरप्रमुख – विठ्ठल गुळघाणे (हिंगणघाट), तालुकाप्रमुख – प्रभाकर चामचो (समुद्रपूर), संघटक – दीपक टोहकर (समुद्रपूर), विधानसभा क्षेत्रप्रमुख – दीपक राऊत (वर्धा).