
अनंत अंबानी यांच्या वन्य प्राण्यांची देखभाल, बचाव, पुनर्वसन आणि त्यांचे संवर्धन करणाऱ्या ‘वनतारा’ या संस्थेची vantara.in ही नवीन वेबसाईट लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या माध्यमातून वन्यप्रेमींना वन्यजीवांबद्दलची सखोल माहिती अनुभवता येईल. तसेच ‘वनतारा’मधील प्राण्यांची झलक घरबसल्या पाहता येईल. वेबसाईटमुळे 360 अंशातून या ‘वनतारा’चे सौंदर्य अनुभवता येणार आहे. येत्या काही महिन्यांत ‘वनतारा’ त्यांच्या वेबसाईटवर विविध प्राण्यांच्या प्रजातींची सखोल माहिती देणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. प्राण्यांचे निवासस्थान, आहार, संवर्धन आणि त्यांच्या बचावासाठी केले जात असलेले प्रयत्न याची तपशीलवार माहिती उपलब्ध असेल. ‘वनतारा’चे जग प्राणिसंग्रहालय नव्हे तर बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून वन्यप्रेमींचे लक्ष वेधत आहे.