
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती व संविधानाचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र देदीप्यमान सोहळा वरळीच्या जांबोरी मैदानात मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. 134 किलोचा केक, डोळ्याचे पारणे फिटणारी आतषबाजी, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.
भीमोत्सव समन्वय समिती वरळी-2025 व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंतीचा भव्यदिव्य सोहळा होणार आहे. यावेळी ख्यातनाम कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. संविधानाचे हे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने 1500 गायक 20 भाषांमध्ये संविधानाचे प्रास्ताविक, संगीतमय सुरात गायन करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती सोहळ्याचे समन्वयक डॉ. विजय कदम यांनी दिली.