साहित्य महामंडळ अध्यक्षपदी मिलिंद जोशी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, वक्ते व मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची एकमताने निवड झाली. सुनीताराजे पवार यांची कार्यवाह म्हणून तर कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य महामंडळाची बैठक आज झाली. यावेळी मावळत्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी नूतन अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. वयाच्या 53 व्या वर्षी अध्यक्षपद भूषविणारे प्रा. जोशी हे महामंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.