अमृतांजन ब्रिजपासून आडोशी बोगद्यापर्यंत 6 किमीच्या रांगा, मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर वाहतुकीचा जांगडगुत्ता

लागोपाठ सुट्टय़ा आल्याने आपल्या कुटुंबकबिल्यासह मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुरुवारी वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. त्यातच खंडाळा बोगद्याजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या डंपरचा पाटा तुटल्याने वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे अमृतांजन ब्रिजपासून आडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या तब्बल सहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीने प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कसरत केली. उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच प्रवाशांच्या डोक्याला ट्रफिक जामचा ताप झाला.