लक्षवेधक – चारधाम यात्रा : हेलिकॉप्टरची 35 हजार तिकिटे 5 मिनिटांत बुक

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू होत आहे. चारधामला जाण्यासाठी हेलिकॉप्टर बुकिंग सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत 35 हजार तिकिटे बुक झाली आहेत. दुपारी 12 वाजता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर बुकिंग सुरू झाली आणि 12.05 पर्यंत सर्व तिकिटे बुक झाली. त्यानंतर क्रीनवर ‘नो रूम’ अशी सूचना दिसत होती. एकाच दिवसात एवढी तिकिटे बुक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा हेलिकॉप्टर सेवा बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीकडे जबाबदारी दिली.

अमेरिकेत गोवरचा उद्रेक, आरोग्य यंत्रणा सतर्क

अमेरिकेत गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. द टेक्सास डिपार्टमेंट ऑफ स्टेट हेल्थ सर्विसेसने खबरदारीचा इशारा दिला आहे. अमेरिकेत 8 एप्रिल रोजी गोवरचे 505 रुग्ण सापडले. आतापर्यंत गोवरने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन शाळकरी मुले व एका प्रौढाचा समावेश आहे. त्यांनी गोवरची लस घेतलेली नव्हती असे आढळून आलेय. गोवर लसीकरण घटल्याने आजाराचा पैलाव झाल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत लसीकरण आणि बूस्टर डोसची चर्चा सुरू झालीय.