
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट आज 11 एप्रिलपासून ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरून ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी अपडेट दिली असून शुक्रवारी चित्रपट उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. ‘आले राजे आले…’ असे कॅप्शन देत नेटफ्लिक्सने ‘छावा’ सिनेमाची तारीख चाहत्यांसोबत शेअर केलीय. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. जगभरात या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता विकी कौशलने, तर औरंगजेबची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यांने साकारली आहे.