
काँग्रेस आमदार कुस्तीपटू विनेश फोगाटने हरयाणाच्या भाजप सरकारकडून सरकारी नोकरी, भूखंडाची ऑफर नाकारली आहे. यासाठी तिने सरकारकडून चार कोटी रुपये रोख मागितले आहेत. विनेशला हरयाणा सरकारकडून सरकारी नोकरी, भूखंड की चार कोटी रुपये रोख बक्षीस अशा तीन ऑफर आल्या होत्या. त्यापैकी रौप्य पदकाचे रोख बक्षीस घेण्यास ती तयार झाली आहे. तिने क्रीडा विभागाला रोख पुरस्काराबाबतचे संमतीपत्र पाठवले असून तिला पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.