
माथेरानमधील मेजवानी हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. हॉटेलमधील एका रुममध्ये ही आग लागली. आगीत रुममधील बेड आणि इलेक्ट्रिक सामान संपूर्ण जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते.
आग लागली तेव्हा रुममधील पर्यटक खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रहदारीच्या मार्गावर हे हॉटेल असल्याने आग लागताच एकच खळबळ उडाली. अग्नीशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. मात्र अग्नीशमन वाहनावर नेहमीप्रमाणे चालकच उपलब्ध नव्हता.