
मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर हुसेन राणाचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्याला हिंदुस्थानात आणण्यात आले आहे. तहव्वूर राणाला आम्ही हिंदुस्थानात आणल्याचा गवगवा केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. या प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी एक पत्रक जारी करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या घटनेचे श्रेये लाटण्यासाठी मोदी सरकारची चढाओढ सुरू आहे, अशी टीका चिदम्बर यांनी केली आहे.
मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर हुसेन राणा याचे 10 एप्रिल 2025 रोजी हिंदुस्थानकडे हस्तांतर करण्यात आले याचा मला आनंद आहे. परंतु संपूर्ण कहाणी सांगणे महत्त्वाचे आहे. मोदी सरकार या घटनेचे श्रेय घेण्यासाठी मोठे दावे करत आहे. पण त्यांच्या दाव्यांपासून सत्य कोसो दूर आहे. हे हस्तांतर म्हणजे अमेरिकेशी समन्वय साधून यूपीए सरकारने केलेल्या आणि टिकवलेल्या दीड दशकाच्या कठोर, अथक आणि धोरणात्मक राजनैतिक कूटनीतीचे यश आहे, असे चिदम्बरम म्हणाले.
श्री पी. चिदंबरम (@PChidambaram_IN), सांसद एवं पूर्व केंद्रीय गृहमंत्री द्वारा जारी किया गया बयान प्रस्तुत है। pic.twitter.com/9G4sb7oBDj
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 10, 2025
फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एका पत्रकार परिषदेत उभे राहून संपूर्ण प्रकरणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण सत्य हे आहे की, हे यश यूपीए सरकारने वर्षानुवर्षे घातलेल्या पायाचे आणि अथक परिश्रमाचे फळ आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की राणा 2005 पासून लश्कर-ए-तोयबा आणि आयएसआयच्या सहकार्याने 26/11 च्या कटात सहभागी होता. अखेर 8 एप्रिल 2025 रोजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी राणाला हिंदुस्थानी एजन्सींच्या स्वाधीन केले आणि तो 10 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पोहोचला, चिदम्बरम यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा
मोदी सरकारने ही प्रक्रिया सुरू केलेली नाही किंवा कोणतेही यश मिळवलेले नाही. ते फक्त यूपीए सरकारने वर्षानुवर्षे केलेले कठोर परिश्रम, शहाणपण आणि राजनैतिक दूरदृष्टीतून उभारलेल्या संस्थात्मक रचनेचा फायदा घेत आहेत. हे प्रत्यार्पण म्हणजे कुठल्या निवडणुकीतला विजय नाही तर, हिंदुस्थानचा प्रामाणिकपणा, गांभीर्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने काम करतो तेव्हा तो जगातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांनाही कायद्याच्या कठड्यात उभा करतो याचा पुरावा आहे, अशा शब्दांत चिदम्बरम यांनी मोदी सरकारला फटकारले.