एकदा चूक होते पण…, अजित पवारांची कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना तंबी!

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल दोनदा वादग्रस्त विधान केली होती. यावरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची कानउघडणी केली आहे. तसेच यापुढे अशी विधानं करू नका, अशी तंबीही दिली आहे.

माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे कोकाटे म्हणाले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी शेतकरी पीककर्ज काढतात आणि मुलांची लग्न लावतात. त्यानंतर कर्ज माफी होईल याची वाट बघतात. या विधानावरून संपूर्ण राज्यात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यावरून कोकाटे यांना माफीही मागतिली होती.

अजित पवार गटाची मुंबईत काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी माणिकराव कोकाटे उशिरा आले होते. तेव्हा अजित पवार कोकाटे यांना म्हणाले की, एकदा दोनदा चूक झाली हे समजू शकतो. पण पुन्हा अशी चूक झाली तर खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी अजित पवार यांनी दिली. तसेच सर्व आमदारांनी नियमितपणे जनता दरबार भरवावा, अशी सूचनाही केली. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.