प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर

शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देताना गुन्हा दाखल असलेल्या जुना राजवाडा पोलीस ज्या-ज्या वेळी तपासासाठी बोलवतील त्या-त्या वेळी हजर राहण्यासह साक्षीदार, फिर्यादी यांना त्रास द्यायचा नाही, अशा अटीही न्यायालयाने कोरटकरला घातल्या आहेत.