
प्रोफेशनल नेटवर्कींग प्लॅटफॉर्म ‘लिंक्डइन’ने देशात काम करण्यासाठी टॉप कंपन्यांची यादी जाहीर केली. टाटा कन्सल्टंसी सर्विसेसने (टीसीएस) या यादीत पहिले स्थान मिळवले, तर दुसऱया स्थानावर ऍक्सेंचर आणि तिसऱया स्थानावर इन्फोसिस आहे. ‘लिंक्डइन’च्या 25 बेस्ट वर्कप्लेस कंपन्यांच्या यादीत पाच पैकी चार कंपन्या आयटी सेक्टरशी संबंधित आहेत. तर एक कंपनी अर्थ क्षेत्रातील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीला ‘लिंक्डइन’ने टॉप 25 च्या यादीत समाविष्ट केलेले नाही. कंपन्या नोकऱया देताना कौशल्यावर जास्त लक्ष देत आहेत. ‘लिंक्डइन’ने साधारण आठ मानकांच्या आधारे ही यादी तयार केली आहे. ऍडव्हान्स योग्यता, स्किल ग्रोथ, कंपनीचे स्थैर्य, बाहेरच्या संधी, कंपनीत समानता, जेंडर डायर्व्हसिटी, शैक्षणिक पार्श्वभूमी, कर्मचाऱयांची उपस्थिती या मुद्दय़ांच्या आधारे कंपन्यांची यादी तयार केलीय.