चारधाम यात्रेसाठी 28 लाख भाविकांची नोंदणी

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. चारधाम यात्रा अक्षय्य तृतीयाच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिलपासून सुरू होईल. याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडतील, तर केदारनाथचे कपाट 2 मे रोजी व बद्रीनाथचे कपाट 4 मे रोजी उघडतील. या वर्षी आतापर्यंत चारधामसाठी 28 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱयातून तसेच विदेशातून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. या वर्षी पहिल्यांदा यात्रेच्या मार्गावर प्रत्येक सेक्टरमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पंच महारथोत्सवाला भक्तीचा महापूर

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया कर्नाटकातील म्हैसूर जिह्यातील नंजनगुड येथे बुधवारी भगवान श्रीकांतेश्वर स्वामीच्या पंच महारथोत्सव (कार महोत्सव) मध्ये लाखो भाविक पोहोचले. कार महोत्सव हा दक्षिण भारतातील एकमेव पंच महारथोत्सव आहे. ज्यात एकाच वेळी पाच रथांची मिरवणूक काढली जाते.