
एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्त्या केल्याची घटना घडली आहे. आणखी दुसऱ्या पुरुषासोबत संबंधाच्या रागातून प्रियकराने चाकूने वार करून तिची हत्या केली. गुरुग्राममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम असे या मृत महिलेचे नाव आहे. नीलम ही बिनोला गावात तिच्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. आणि त्याच ठिकाणी कामालाही होती. नीलमचे विनोद आणि सुधीर या दोन पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती नीलमच्या नवऱ्यानेच पोलिसांना दिली. तसेच पतीने आपल्या पत्नीच्या हत्येचा घटनाक्रमही पोलिसांनी सांगितला.
सोमवारी संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा विनोद आमच्या घरात बसला होता. माझी बायको आणि विनोद यांच्यात तिचे सुधीरसोबत प्रेमसंबंध असल्यावरून वाद सुरू होते. त्याच वेळी तिने विनोदला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, विनोदने तिचे एकले नाही. रागात येऊन त्याने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि तिच्या पोटात वार केले. आणि पळून गेला. यामुळे नीलम गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
मंगळवारी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कांधवाचक गावातील रहिवासी असलेल्या विनोदला अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान विनोदने नीलमशी त्याचे संबंध असल्याचे उघड केले आणि नीलमच्या हत्येची कबुली दिली.