टॅरिफच्या संकटात रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कपात; गृह, वाहन कर्जाचा EMI होणार कमी

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला आहे. गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 25 बेसिस प्वॉइंटने कपात केली आहे. या कपातीनंतर रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून यंदाच्या वर्षातील रेपो रेटमधील ही दुसरी कपात आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पतधोरण आढाव्याच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने 25 बेसिस प्वॉइंटची कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 6.50 वरून कमी होऊन 6.25 आला होता. आज 9 एप्रिल आहे आणि आजच्या 25 बेसिस प्वॉइंटच्या कपातीनंतर रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे.

गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार

काय होईल परिणाम?

रेपो रेट कमी केल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून स्वत दरात कर्ज मिळेल. आणि त्यानंत बँकांनाही ग्राहकांना कमी व्याजदरावर कर्ज देता येईल. रेपो रेट कमी झाल्याने बँकांना निधी जमवण्यात कमी खर्च करावा लागेल. रेपो रेट कमी झाल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तीक (पर्सनल) कर्जावरील व्याजदर कमी होते. व्याजदर कमी झाल्याने त्याचा EMI वर परिणाम होतो आणि सामान्य कर्जदारांवरील EMI बोजा काहीसा कमी होतो.

गृहकर्जावर टॉप-अप मिळवणे आता अवघड; मालमत्तांवरील कर्जाचे निकष बदलणार

कोणाला होणार फायदा?

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने बँका व्यादरात कपात करतील. त्यामुळे गृह कर्जदारांचा EMI कमी होईल. ज्यांनी फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज घेतले आहे, त्यांना दिलासा मिळेल. याशिवाय घर घेण्याचे ज्यांचे स्वप्न आहे त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळाल्याने फायदा होईल. सध्या गृह कर्जावरील व्याजदर हे 8.10 ते 9.5 दरम्यान आहे. बँकांकडून व्याजदर कपातीची आपेक्षा आहे. फक्त गृह कर्जच नव्हे तर वाहन कर्जाचा EMI ही कमी होईल.