
चंद्रपूरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावरून मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. वाघांना आमच्या पासून थोडं दूर घेवून जावं. वाघांची ट्रान्सफर करा आणि बाहेर पाठवा, वाघ वाढले तर आम्ही झाडावर राहू आणि वाघ खाली फिरत राहील, अशी आमची जंगली अवस्था करणार आहात का असा संतप्त सवाल शोभा फडणवीस यांनी सरकारला केला.
पूर्वी बफरचे 8 गेट होते. आता 24 गेट झाले आहेत. यातून सरकार पैसे मिळवतेय पण आमचं काय? आम्ही पशू खाद्य नाही, आम्हालाही जगावस वाटतय. आम्ही जगायचं नाही का? असही त्या म्हणाल्या. या सगळ्याचा फॉरेस्ट वाल्यांनी विचार करावा? बफर मधील गेट बंद करावे. वाघांना बाहेर पाठवा इथले वाघ कमी करा आम्हाला सुरक्षितता द्या नाही तर जनस्पोट केव्हाही होवू शकतो असा इशारा शोभा फडणवीस यांनी दिला.